दिल्लीचा लखनौविरुद्ध सहज विजय   

लखनौ : आयपीएलमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने ८ फलंदाज राखुन लखनौच्या संघावर सहज विजय मिळविला. मुकेशकुमार याला सामनावीराचा किताब देण्यात आला. 
 
या सामन्यात   लखनऊच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १५९ धावा केल्या यावेळी ६ महत्त्वपुर्ण फलंदाज बाद झाले. त्यामुळे दिल्लीच्या संघाला १६० धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने १७.५ षटकांत १६१ धावा केल्या. आणि फक्त दोन बळींच्या मोबदल्यात हा सामना जिंकला. 
 
दिल्लीकडून फलंदाजी करताना अभिषेक पोरेल याने ३६ चेंडूत ५१ धावा केल्या. यावेळी त्याने पाच चौकार आणि एक षटकार मारला. त्याला साथ देताना करूण नायर याने १५ धावा केल्या. मार्कराम याने करूण नायरचा त्रिफळा उडविला. के.ल. राहुल याने नाबाद ५७ धावा केल्या. अक्सर पटेल याने नाबाद ३४ धावा केल्या. तर ४ अवांतर धावा दिल्लीच्या संघाला मिळाल्या. 
 
तसेच दिल्लीच्या गोलंदाजांपैकी मुकेशकुमार याने चार महत्त्वपुर्ण फलंदाज बाद केले. तर मिचेल स्टार्क याने एक फलंदाज बाद केला. चामरा याला देखील एक गडी बाद करता आला. दिल्लीच्या प्रभावी गोलंदाजीमुळे लखनौच्या संघाला मोठी धावसंख्या उभा करता आली नाही. त्याआधी लखनौ संघाचा सलामीवीर मार्कराम याने शानदार अर्धशतक केले. त्याने ३३ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याला साथ देताना मिचेल मार्श हा ४५ धावांवर बाद झाला. त्याचे अर्धशतक अवघ्या पाच धावांनी हुकले.त्यानंतर निकोलस पूरन हा ९ धावांवर बाद झाला. अब्दुल समद याने फक्त दोन धावा केल्या. डेविड मिलर याने नाबाद १४ धावा केल्या. आयुष बडोनी ३६ धावांवर बाद झाला. पंत शून्यावर तंबूत माघारी परतला.
 
संक्षिप्त धावफलक 
 
दिल्ली कॅपिटल्स : अभिषेक पोरेल ५१, करुण नायर १५, लोकेश राहुल नाबाद ५७, अक्सर पटेल नाबाद ३४, अवांतर ४ एकूण १७.५ षटकांत १६१/२ लखनौ सूपर जायंटस :
मार्कराम ५२, मिचेल मार्श ४५, पुरन ९, अब्दुल समाद २, डेविड मिलर १४, आयुष बडोनी ३६, पंत ० एकूण २० षटकांत १५९/६

Related Articles